अनुभूती म्हणजे आपल्याला समोर येणाऱ्या, आपण अनुभवलेल्या अनुभवात प्रत्यक्ष सोबत करून त्या अनुभवाची संवेदना समजणे त्याला व्यक्त करणे होय. हि अनुभूती कोणा एकाची नसून ती समूहाची आहे, माझी तुझी सर्वांची आहे. याच संकल्पनेतून अनुभूतीचा प्रवास सुरु झाला आहे. समुदायाचा जर उत्पादक कणा म्हणून जर आपण कोणत्या घटकाकडे पाहत असू तर तो आजचा युवा वर्ग आहे. मात्र व्यवस्थेने आखून ठेवलेल्या चक्रव्यूहात हा वर्ग गुरफटून जाण्याचा धोका आहे. कधी जातीच्या धर्माच्या, भाषेच्या तर कधी प्रांत, लिंग यांसारखी उतरणं या वर्गाला विभाजित करून त्यांची अस्मिता आणि अस्तित्व याला वेगळाच चेहरा देऊ पाहते.

अनुभूती म्हणून याच युवा सोबत काम करन अगत्याच वाटत आहे. म्हणूनच संस्थेच्या मुख्य विषयात युथ लीडरशिप हा कामाचा गाभा ठेऊन संस्था वाटचाल करत आहे. युथ म्हंटले तर केवळ नवरात्रो मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ या मध्ये दिसणारे युवा आपल्या नजरेस येतात. युथ म्हणजे युवतींचा समावेश हि बाब जणू उमगतच नाही. अनुभूती संचालित युवा–युवती याची जाणीवे सोबतच गटबांधणी होत आहे. युवा युवतीसोबत शरीरसाक्षारता, वस्तीसाक्षरता, पुढाकार, सह्भागीता, अभिव्यक्ती, या सर्व मुलभूत अंगाना अनुसरून अनेक गतीविधी मार्फत कार्य होत आहे. मग ग्रामीण भागातील, शहरी वस्त्यांमधील युवा युवतीसोबत सत्र, कार्यशाळा, शिबीर, गटकेन्द्री चर्चा, वादविवाद सत्र, खेळ, अभियान या माध्यमांचा वापर करत आहोत. या सर्व उपक्रमात एक महत्वाचा उपक्रम म्हणून संस्था या युवा-युवतीचे नेटवर्क उभे करत आहे. ज्याची सुरुवात खूपच झाली आहे. ज्यामध्ये सर्व स्तरातील युवा युवती एकत्र येत आहेत. शिक्षण घेणारे, संघटीत–असंघटीत क्षेत्रात काम करणारे हे सदस्य एकत्र येऊन चर्चा रंगवत आहे.

IMG-20160706-WA0003
युवा नेटवर्कची स्थापना!

या नेटवर्क ची सुरुवात हि २३/६/१६ पासून झाली आहे. ३० सदस्य या नेटवर्क मध्ये सक्रीय आहेत. स्व-ओळख, मी आणि माझा परिसर, याला समजून घेतले आहे. माझी ओळख आणि माझा परिसर याची विविध अंगी असणारी गुंतागुंत उलगडण्याची प्रक्रिया सुरु आहे. मी आणि माझा झा परिसर हि केवळ एक एकाकी बाब नसून ती जातीच्या, आर्थिक स्तराच्या, शहरी – ग्रामीण तफावतीच्या, प्रांतीय दरीच्या, भाषीक वादाचा, लिंगभिन्नतेचा, धार्मिक सत्तेचा यावर कशा परिणाम होतो हे कोडे हे युथ सोडवत आहे. personal is political हि संकल्पना हा गट समजू पाहत आहे. स्वताच्या असण्याचा गाभार्थ शोधू पाहत आहे. त्याच सोबत युथ म्हणून स्वताच्या जबाबदारीचे ओझे देखील या गटाला जाणवत आहे. या सदस्यांच्या व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास, नेतृत्वगुण विकास करण्याच्या माध्यमातूनच यामध्ये लिंगन्यायाची, समतेची, गरीमेची, किंबहुना जबाबदार नागरिकतत्वांच्या बीजाची पेरणी सुरु झाली आहे.