आजकाल प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात. समाजात काय चालले आहे? यावर क्वचितच कोणाचे लक्ष असावे. तसे पाहता आपण सगळेच आपल्या समाजाचा एक घटक आहोत. आपल्या जवळपास काय चालू आहे ये माहीत असणे गरजेचे भासते. अशाच प्रकारे आजच्या काळातले युवक-युवती हे आपल्या जीवाच्या आकांतापासून समाजाचे कार्य करतांना आपणांस दिसून येतात.
काही प्रमाणात हे शहरी भागांमध्ये दिसतेच परंतु याचे जास्तीत जास्त प्रमाण खेडेगावातील छोट्या-छोट्या वस्त्यांमध्ये देखील आढळून येते. १३ किंवा १६ वर्षांपासूनचे युवक-युवती हे आपल्या खेड्यांमध्ये प्रज्वलदिप बनून प्रकाश देण्याचे कार्य करतानाचे एक उदाहरण जे ठाणे जिल्ह्यात डोंबिवली पूर्व या भागातून जवळपास ६ किलोमीटर अंतर असलेल्या विभागात म्हणजेच कोळेगाव येथे अनुभूती संस्थे मार्फत काही युवक-युवती आपल्या संविधानिक मूल्यांना घेऊन कार्य करीत आहेत. कोळेगाव हे “२७ गावांमधील” एक गाव मानले जाते, जेथे सरकारी योजना या काही प्रमाणात राबवल्या जातात. त्यामुळेच आपल्या गावाच्या विकासासाठी संस्थेतील युवक-युवती आपल्या गावापासून समाजप्रबोधन व त्याला घडविण्याचे कार्य करीत आहेत. त्यातच त्यांचा एक प्रकल्प त्यांनी राबवल्या नुसार जे आपल्या मुलभूत अधिकारांमध्ये येते ते म्हणजे शिक्षण.
शिक्षणाच्या अधिकाराचे त्यांचे हे काम वेगवेगळे प्रकल्प जसे सहभागी होण्याचा अधिकार, समतेचा अधिकार, नेतृत्वाचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार या काही मुलभूत घटकांना घेऊन चालते. त्यांचा हा यशस्वी झालेला प्रकल्प! गावातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वस्तीतील लोकांशी संवाद साधून शिक्षण हे किती महत्वाचे आहे, तसेच शिक्षणाला वयाची अट नसून तो आपला हक्क आहे व तो आपण मिळवला पाहिजे या बाबींना घेऊन गावातील स्त्री, पुरुष, युवक-युवती – काही नापास झालेले तर काही परिस्थिती मुळे शिकू शकले नाहीत, तर काही स्थलांतर झाले असून त्यांना शिक्षणाबाबतीत फार माहिती नसल्यामुळे त्यांनी हे कधी प्राधान्यामध्ये आणले नाही. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे व तसेच समाजात वंचित असलेले आपलेचं घटक त्यांना हक्क मिळवून देण्याचा अतिशय महत्वाचा प्रकल्प लोकांच्या सहभागातून करीत असतांना युवक-युवतींनी उन्हामध्ये उष्णतेचा सामना करून वस्तीतील अनेक लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्यासोबत छोट्या-छोट्या सभा राबवून त्यांची कारणे लक्षात घेतली ज्यात जास्तीत जास्त प्रमाणात लोक आर्थिक दृष्ट्या भक्कम नसल्यामुळे काहींनी शाळा सोडली तर काहीजणांनी जबाबदारी मुळे आपल्या स्वप्नांचा बळी देण्याचाही प्रयत्न केला. परंतु आपल्या युवक-युवतींने त्यांना विश्वासातून व माहिती नुसार हे पटवून दिले की आपली कारण ही नकारात्मक आहेत आपण त्यांना सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास ते किती सुंदर प्रकारे आपल्या जीवनात कार्यरत ठरतात. याच सकारात्मक विचारांनी, जोमाने व उत्साहाने गावातील ३० युवक-युवती, स्त्री व पुरुष यांचे शाळेतील प्रवेश ही नवीन उत्साहाने पार पाडली आहे.
गावातील वेगवेगळ्या क्षेत्रात कारकिर्द करणारे कोणी अभियंता, वैद्यकिय, वाणिज्य, कला अशा नावाजलेल्या क्षेत्रांमध्ये स्वत:ला पाहू इच्छितात. त्यांच्या स्वप्नांना यश मिळवून देण्यासाठी कोळेगावातील युवक-युवतींनी संविधानिक मूल्यांना घेऊन कार्य पार पाडले परंतु आर्थिक दृष्ट्या लोकांचे प्रश्न असल्यामुळे व स्वतः युवक व युवतींचे प्रश्न असल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागतेच. जसे अभियंता (इंजिनियरिंग) करणाऱ्या युवक-युवतींना हवे त्या क्षेत्रात आर्थिक परिस्थिती मुळे प्रवेश घेता न येणे; तसेच तृतीय लिंग असणार्या व्यक्तीच्या गरिमेला ठेच पोहचून शिक्षणाचा पाया सुटणे.अशा अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण पुन्हा सुरू करण्याची हिम्मत आणणे, स्वतः वर विश्वास ठेवून नवी सुरुवात करणे हे मोठे आव्हान आहे अनेक अडचणींवर मात करून जाण्याची तयारी आहे ;पण मुख्य आव्हान आहे आर्थिक सहाय्य मिळवण्याची!
युवा-युवतीं नी गावातील ज्यांचे शिक्षण खंडित झाले आहे अशा ३० जणांना पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्यासाठी तयार केले आहे, गरज आहे छोट्या छोट्या स्कॉलरशिप ची!यात SC/ST/NT/अल्पसंख्याक समाजातील घटक/ट्रान्सजेंडर व्यक्ती अशा समाजातील दुर्लक्षित घटकांचा समावेश आहे.
प्रत्येकी सरासरी सात हजार रुपये वार्षिक खर्च आहे. ज्यामधे फि, वह्या पुस्तके, न्युट्रीशन, प्रवासखर्च यांचा समावेश आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की या उपक्रमाला आर्थिक सहाय्य करून युवा – युवतींच्या शिक्षणासाठी पाठिंबा द्यावा!
– पूनम लबडे, २० वर्ष
हा प्रकल्प मुंबई विभागात विले पार्ले पूर्व येथील बामनवाडा मधील युवतींनी देखील राबवला आहे.
लेखिका कोळेगाव येथील अनुभूती संचालित युवा-युवती नेतृत्व प्रकल्पात काम करतात.